Description: |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी समन्वय समिती आयोजित भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंती दिना निमित्त दादर चैत्यभूमी येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या शुभहस्ते "चैत्यभूमी" स्मारकाचे पोस्टल टिकिटाचे उद्घाटन करण्यात आले.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,मुंबई उपनगराचे पालक मंत्री आरिफ नसीम खान,मुंबई शहराचे पालक मंत्री जयंत पाटिल,मुंबई महापौर सुनील प्रभु,मंत्री वर्षाताई गायकवाड,राज्यमंत्री सचिन अहिर,आमदार चंद्रकांत हंडोरे,महाराष्ट्राचे पोस्ट मास्टर जनरल के.सी.मिश्रा,चैत्यभूमी समनव्य समिती पदाधिकारी महेंद्र साळवे,नाग्सीन कांबळे,मुंबई काँग्रेस मागासवर्गीय विभाग अध्यक्ष गणेश कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |