Description: |
आधुनिक भारताचे शिल्पकार,पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त मुंबई काँग्रेस तर्फे बांद्रा येथील रंगशारदा सभागृह येथे त्यांच्या जीवनातील विशेष छायाचित्रांचे प्रदर्शन त्यांच्या कार्यकाळातील विशेष कामगिरी वर व्याख्यान व राष्ट्रावंदना देश भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक तसेच उद्घाटक माजी केंद्रीय मंत्री खासदार मणिशंकर अय्यर व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश,मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह,माजी खासदार प्रिया दत्त,एकनाथ गायकवाड,प्रदेश काँग्रेस पदाधिकारी,आमदार वर्षाताई गायकवाड,आमदार नसीम खान, माजी आमदार मधु चव्हाण, बाबा सिद्दिकी,सुरेश शेट्टी,अशोक जाधव, चरणसिंह सप्रा,भूषण पाटील,संदेश कोंडविलकर, गणेश कुमार यादव व आदि मान्यवर उपस्थित होते. |