| Description: |
पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये प्रतिलिटर अधिभार आकारणाऱ्या भाजपा–शिवसेना सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने पेट्रोल–डीझेल दर वाढी विरोधात फॅशन स्ट्रीट ट्राफिक पोलिस चौकी (क्रॉस मैदान) ते महानगरपालिका आझाद मैदान येथे भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.सदर भव्य बैलगाडी मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम यांनी केले.मोर्चात सामील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते,माजी खासदार,आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष,नगरसेवक,नगरसेविका,ब्लॉक अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष,महिला काँग्रेस,युथ काँग्रेस, एन.एस.यु.आय. आणि काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. |