Random image |
 |
 176-Bandra(E) Assembly Constituency Congress-NCP Candidate Narayanrao Rane at Govt.Colony Bandra during Campaign Rally.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
Swabhiman Sanghatana President & MLA Nitesh Narayanrao Rane" Panel Win's at Lilavati Hospital Bandra.
| Swabhiman Sanghatana President & MLA Nitesh Narayanrao Rane" Panel Win's at Lilavati Hospital Bandra. |
| Description: |
सुप्रसिद्ध 'लीलावती हॉस्पिटल' निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्या 'स्वाभिमान समर्थ'चे वर्चस्व...मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलमधील कामगारांच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला.या निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्या 'स्वाभिमान समर्थ पॅनेल'ने १३ पैकी १० जागा जिंकत प्रतिस्पर्धी शिवसेना, मनसे युनियनचा धुव्वा उडवला. त्यांना फक्त ३च जागांवर समाधान मानावे लागले. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष, युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील 'महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना',तसेच शिवसेना,मनसे यांच्या कामगार संघटनांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.मात्र मागील काही वर्षांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये कामगारांचे नेतृत्व करणा-या 'समर्थ कामगार संघटनेने' कामगारांचा विश्वास संपादन केला आहे. सेना-मनसेच्या कामगार संघटनांनी आणि त्यांच्या पदाधिका-यांनी स्वार्थासाठी लीलावतीच्या कामगारांचा वापर केला. मात्र कामगारांच्या प्रश्नांवर आमदार नितेश राणे यांनी तसेच 'समर्थ'च्या पदाधिका-यांनी जातीने लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मिळालेला हा प्रचंड विजय कामगारांच्या विश्वासाचीच पोचपावती आहे. या भव्य विजयात 'महाराष्ट्र समर्थ कामगार संघटने'चे सरचिटणीस प्रवीण नलावडे, उपाध्यक्ष संदीप राणे, चिटणीस विश्वनाथ दळवी, लीलावती हॉस्पिटल युनिट अध्यक्ष सुरेश पवार यांनी मोलाची कामगिरी बजावली."स्वाभिमान समर्थ पॅनेल"चे विजयी शिलेदार १) जतीन पाटील २) दीपक निलवे ३) हेमंत घरे ४) शैलेश पटेल ५) विशाल तरे ६) सुभाष पाटील ७) शीतल पाटील ८) शशिकांत विन्हेरकर ९) मंगेश भांगरे १०) बाळकृष्ण माने.लीलावतीच्या समस्त कर्मचारी बंधू-भगिनींनी टाकलेल्या विश्वासाबद्दल मन:पूर्वक आभार. आपण टाकलेला विश्वासाला स्वाभिमान समर्थ पॅनेल' निश्चित सार्थ करील.कर्मचा-यांचे उज्ज्वल भविष्य हेच आमचे ध्येय! |
| Keywords: |
|
| Date: |
|
| Hits: |
0 |
| Downloads: |
14 |
| Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
| File size: |
523.0 KB |
| Added by: |
admin |
|
|
 |