Description: |
आधुनिक भारताचे शिल्पकार, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त मुंबई कॉंग्रेस तर्फे बालदिनी मालपाणी ग्राउंड, सत्या नगर, बोरीवली पश्चिम येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व लहान मुलांकरिता विनामूल्य बालचित्रपट गृह, मेगा नृत्य स्पर्धा आणि FUN – N – FAIR चे आयोजन करण्यात आले .त्याप्रसंगी माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले .तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,आयोजक मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील,मान्यवर अतिथी माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह, आमदार असलम शेख उपस्थित होते. तसेच सदरप्रसंगी मुंबई कॉंग्रेसचे मुखपत्राच्या (कॉंग्रेस दर्शन) पंडित जवाहरलाल नेहरू जयंती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. |