| Description: |
भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त मुंबई काँग्रेस आयोजित प्रियादर्शनी "इंदिरा गांधी पुरस्कार" सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह येथे माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस जनार्दन दिवेदी यांचा प्रमुख उपस्थित यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झाला.तद्प्रसंगी अभिनेत्री व समाज सेविका जुही चावला,अंतरराष्ट्रीय एथलिट कविता राऊत, लेखिका- कवियत्री कविता महाजन, अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी,शिक्षणतज्ञ्य फरीदा लांबे,उधोगपती डॉ.मेघा फंसाळकर व संपादिका राही भिडे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, कार्यक्रमाच्या संयोजक माजी खासदार प्रिय दत्त,काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा,माजी खासदार एकनाथ गायकवाड, व आजी माजी आमदार,नगरसेवक,प्रदेश पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. |