| Description: |
रिपाई लोकनेते खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वात विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त काढण्यात आलेल्या जाती तोडो समाज जोडो भारत भीम यात्रेचे मुंबईत आगमन झाले.दहिसर ते दादर चैत्यभूमी भिमरथ शोभा यात्रा मिरवणूक काढण्यात आली या यात्रेचे प्रत्येक नाक्य चौकात स्वागत करण्यात आले.त्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थितीत लावली खासदार गोपाळ शेट्टी, खासदार महादेव जानकर, भीमराव जामुने,गौतम सोनावणे, अविनाश महातेकर,सिद्धार्थ कासारे, ईश्वर तायडे,सचिन मोहिते,रमेश गायकवाड,रवी गायकवाड,रिपाई समर्थक मान्यवर बंधू-भगिनी उपस्थित होते |