Random image |
 |
 Congress - NCP Leaders Meeting at Y.B. Chavan .
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
Mumbai Congress Protest Against Price Hike Petrol-Diesel-Gas Cylinder all Over Mumbai.
Mumbai Congress Protest Against Price Hike Petrol-Diesel-Gas Cylinder all Over Mumbai. |
Description: |
मुंबईमध्येच फक्त पेट्रोल आणि डीझेलची प्रती लिटर किंमत संपूर्ण देशामध्ये जास्त आहे. मुंबईकरांनी शिवसेना भाजपला ६ खासदार, ३० आमदार आणि मुंबई महानगरपालिका दिली त्याच मुंबईकरांवर हा खूप मोठा अन्याय आहे. हि मुंबईकरांची लूट आहे. मुंबईमध्येच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती सगळ्यात जास्त आहे. हा मुंबईकरांवर अन्याय आहे. मुंबईमध्येच सगळ्यात महाग पेट्रोल रुपये ८१/- प्रती लिटर आणि डीझेल रुपये ६८/- प्रती लिटर आणि हि मुंबईकरांची छळवणूक आहे. सगळ्यात जास्त टॅक्स भाजपा सरकार लावत आहे. एक्साइज ड्यूटी, वॅट आणि सेस सर्वात जास्त असल्यामुळे मुंबईकरांना पेट्रोल व डीझेल महाग मिळत आहे. आमची अशी मागणी आहे की भाजपा सरकारने पेट्रोल आणि डीझेलला जीएसटीमध्ये जर आणले तर पेट्रोल आणि डीझेल मुंबईकरांना अर्ध्या किंमतीत मिळतील.यामुळे मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळेल. मुंबई काँग्रेसतर्फे गुरुवार दि. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सायं ४ वाजता मुंबईतील प्रमुख २१ रेल्वे स्थानकावर या अन्यायकारक पेट्रोल व डीझेल दरवाढी विरोधात ‘‘जनजागरण अभियान’’ करण्यात आले.त्याप्रसंगी गोरेगाव पश्चिम येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबई सीएसटी, सँडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर,दादर येथे आमदार वर्षाताई गायकवाड व माजी खासदार एकनाथराव गायकवाड , महेंद्र मुणगेकर,कचरू यादव यांच्या नेतृत्वाखाली तसेच भायखळा येथे माजी आमदार मधू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, शिवडी, ग्रांट रोड, माहीम पश्चिम, सायन, वडाळा, चेंबूर येथे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली, गोवंडी,घाटकोपर पूर्व, मुलुंड, बोरिवली, मालाड पश्चिम आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली, अंधेरी पश्चिम, बांद्रा पूर्व, कुर्ला आणि साकीनाका मेट्रो स्टेशन या प्रमुख रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहून लोकल प्रवाशांना माहिती पत्रक देऊन आणि छोटी सभा घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात अली. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
0 |
Downloads: |
26 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
782.5 KB |
Added by: |
admin |
|
IPTC Info |
Copyright Notice: |
|
|
|
 |