Registered users
Random image

MPCC President Ashokrao Chavan on his Birthday at Gandhi Bhavan.
MPCC President Ashokrao Chavan on his Birthday at Gandhi Bhavan.
Comments: 0
admin


MPCC Leaders at Raj Bhavan पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा!
MPCC Leaders at Raj Bhavan पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा!



            

MPCC Leaders at Raj Bhavan पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा!
Description: देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून हेरगिरी केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकारी, इतर विरोधी पक्षांचे नेते यांचीही हेरगिरी करण्यात आलेली आहे. संविधानाने दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा हा हल्ला तर आहेच परंतु लोकशाही मुल्याच्या मुळावरच घाव घातलेला आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून काँग्रेसने आज राज्यपालांना भेटून निवेदन दिले. या निवेदनात हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांनी आज राजभवनसमोर केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हेरगिरीचा निषेध केला. या शिष्टमंडळात उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशु संवर्धनमंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसिम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष संजय राठोड, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, आ. अमर राजूरकर, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आ. झिशान सिद्दीकी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस राजन भोसले, प्रा. प्रकाश सोनावणे, प्रमोद मोरे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आदी उपस्थित होते.
Keywords:  
Date: 25.09.2021 15:33
Hits: 0
Downloads: 1
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 260.4 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   MPCC Leaders at Raj Bhavan पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा  
 Next image:
MPCC Leaders at Tilak Bhavan.   

 

Powered by : Vapour Soft