Description: |
महाराष्ट्र प्रदेश व मुंबई प्रदेश कॉंग्रेस तर्फे आझाद मैदान येथे २८ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणारा कॉंग्रेस वर्धापन दिनानिमित्त आझाद मैदान येथे भव्य कार्यकर्ता मेळावा होणार असून त्यासाठी पूर्व तयारी म्हणून राजीव गांधी भवन एम.आर.सी.सी.येथे सर्व पदाधीकारीयांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.बैठकी नंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आझाद मैदानाची पाहणी केली.त्याप्रसंगी खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री वर्षाताई गायकवाड,मंत्री सुरेश शेट्टी,आमदार व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार अमीन पटेल,आमदार जगन्नाथ शेट्टी,आमदार बलदेव खोसा,माजी आमदार जनार्दन चांदोरकर,मुंबई कॉंग्रेस अल्पसंख्याक सेल अध्यक्ष निजामुद्दिन राईन व आदि मान्यवर उपस्थित होते. |