| Description: |
महायुती तर्फे महाराष्ट्रातून राज्यसभेचे उमेदवार म्हणून रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज विधान भवन येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी अनंत काळसे यांना सादर केला.त्याप्रसंगी भाजपा नेते व गोपीनाथ मुंडे,विधानसभा विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे,विधान परिषद विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फाडणवीस,सौ.सीमाताई रामदास आठवले,किरीट सोमैया,शिवसेना नेत्या निलीमताई गोरे,सर्वश्री आमदार डॉ.दीपक सावंत,विनोद घोसाळकर,रवींद्र वायकर,भाई गीरकर,रिपाई आमदार सुमंतराव गायकवाड,रिपाई नेते अविनाश मातेकर,अर्जुन डांगळे व आदि मान्यवर.तद्नंतर रिपाई नेते रामदास आठवले व असंख्य कार्याकार्त्यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन महामानाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. |