Random image |
|
MPCC SPOKESPERSON TRAINING CAMP AT NERUL.
Comments: 2 admin
|
|
|
|
|
Launch of "Narega" Documentary Film.
Launch of "Narega" Documentary Film. |
Description: |
“नरेगा” अंतर्गत तयार केलेल्या शैक्षणिक माहितीपटाचे मा.मंत्री (रोहयो) यांच्या हस्ते प्रकाशन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची एक अत्यंत महत्वाकांक्षी व देशव्यापी योजना आहे.या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात होत असून महाराष्ट्रातील सर्व ३४ ग्रामीण जिल्हयांमध्ये याची अंमलबजावणी यशस्वीपणे होत आहे.ग्रामीण भागातील जनतेला वर्षभरात किमान १०० दिवस त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध व्हावा हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून उर्वरित दिवसांसाठी महाराष्ट्र राज्य रोजगार उपलब्ध करुन देत असल्याने वर्षाचे ३६५ दिवस रोजगार उपलब्ध होऊन ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या रोहयो विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजनेचा ग्रामपंचायत हा केंद्रबिंदू असून सरपंच, ग्रामसेवक आणि ग्राम रोजगार सेवक हे त्यातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत. यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत हया योजनेची माहिती पोहोचवून योजनेस जास्तीत जास्त प्रतिसाद मिळतो. यासाठी हया योजनेची समग्र माहिती तसेच, या योजनेच्या अंमलबजावणीत सरपंच, ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवक यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये समजणे अत्यंत महत्वाचे आहे. या योजनेतील त्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या चांगल्या पध्दतीने समजण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमातून अत्यंत सोप्या भाषेमध्ये “माहिती नरेगाची-कर्तव्ये आपली-भाग १” या माहितीपटाची निर्मिती रोहयो विभागाने केली आहे. या माहितीपटाचे प्रकाशन दि. २७ ऑगस्ट, २०१४ रोजी मा. मंत्री, डॉ.नितिन राऊत, रोहयो व जलसंधारण विभाग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही राज्यव्यापी योजना असल्याने हा माहितीपट राज्यातील सर्व ग्रामपंचायतींपर्यत पोहोचविला जाणार आहे. तसेच, विविध प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातूनही दाखवला जाणार आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावरील यंत्रणांना योजनेची परिपूर्ण माहिती होईल आणि योजनेच्या अंमलबजावणीस चांगला प्रतिसाद मिळू शकेल असे मत मा. मंत्री महोदयांनी व्यक्त केले.या माहितीपटाच्या उद्घाटनास मा. मंत्री डॉ.नितिन राऊत, (रोहयो आणि जलसंधारण विभाग),श्री. गिरिराज, प्रधान सचिव (रोहयो व जलसंधारण), श्रीम. प्रणाली चिटणीस, सहसचिव (रोहयो), उप सचिव, श्रीम.आर.विमला आणि रोहयो विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच,प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, माहिती व जनसंपर्क संचालनालय विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन रोहयो विभागाच्या उप सचिव, श्रीम.आर.विमला यांनी केली. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
20 |
Downloads: |
28 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
192.3 KB |
Added by: |
admin |
|
|
|