Description: |
मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...
असं म्हणत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.या शपथेसह देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे,सुधीर मुनगंटीवार,विनोद तावडे,प्रकाश मेहता,चंद्रकांत पाटील,पंकजा मुंडे,विष्णू सावरा, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी शपथ घेतली.त्याप्रसंगी सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजप अध्यक्ष अमित शाह,भाजपनेते लालकृष्ण अडवाणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,रिपाई नेते रामदास आठवले यांच्यासह दिग्गजांनी शपथविधील हजेरी लावली. |